Last Updated on October 10, 2023 12:16 am by INDIAN AWAAZ
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणारी याचिका शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी सादर केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयानं हे आदेश दिल्याची माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे.