Last Updated on October 16, 2023 12:38 am by INDIAN AWAAZ

AIR

समृध्दी महामार्गावर काल मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिकमधले १२ जण ठार आणि २३ जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरजवळच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे.

प्रधानमंत्र्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये इतकी मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसंच जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.